नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
प्रत्येक दिवस किती महत्त्वाचा असतो हे गुगला चांगलेच माहिती आहे. प्रत्येक दिवसाचे महत्त्व ओळखून गुगल त्यानिमित्त खास डूडल तयार करत असते. या गुगल डूडलच्या माध्यमातून नवीन माहिती मिळतेच पण आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे देखील समजते. गुगलने आजच्या दिवशी एक खास डूडल साकारले आहे. गुगलने आज अमेरिकी अभिनेत्री, गायक, नृतिका, शर्ली टेंपलचे एनिमेटेड डूडल साकारून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आजच्या दिवशी सेंट्रा मॉनिका हिस्ट्री म्युझियमने ‘Love, Shirley Temple’ नावाने त्यांच्या एका प्रदर्शनाची सुरुवात केली होती. यामध्ये त्यांच्या काही आठवणींच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
शर्ली टेंपल यांचा जन्म २३ एप्रिल १९२८ रोजी कॅलिफॉर्नियात झाला होता. वयाच्या ६व्या वर्षी त्यांना अकादमी अवॉर्ड म्हणजे ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. टेंपल यांनी ‘स्टँड अब अँड चीअर’ आणि ‘ब्राईट आइज’ सारखे अनेक चित्रपटात काम केले. मग वयाच्या २२व्या वर्षी रिटायर होऊन जनसेवासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले.
शर्ली टेंपल यांना श्रद्धांजली देताना गुगलने म्हटले आहे की, शर्ली टेंपल यांनी हॉलिवूडच्या शीर्ष बॉक्स ऑफिसच्या घसरणीनंतर आलेल्या बंदीत केवळ लाखो लोकांची मदत केली नाही तर नंतर आंतरराष्ट्रीय संबंधात आपले काम करून जगात नाव कमावले. शर्ली टेंपल यांना १९६९ मध्ये संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे प्रतिनिधीत्व म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आपल्या राजकीय कार्यकाळात त्यांनी घाना मध्ये राजदूत आणि विदेश विभागात प्रोटोकोलची पहिली महिला प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. १९८८ साली त्यांना मानद विदेश सेवा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









