प्रतिनिधी/शिरोळ
पाच महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमचे नेते आघाडीचे प्रमुख गणपतराव पाटील यांची भेट घेऊन आपण त्यांच्याकडे राजीनामा सादर करण्यासाठी गेले होते. परंतु सध्या जागतिक कोरोणाचे संकट असल्याने राजीनामा दिल्यानंतर नवीन निवड होण्यास कोणती अडचण येईल का याची शासकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊ नवीन निवडीस कोणत अडचण येणार नसेल तर राजीनामा द्यावा असा सल्ला दिल्याने आपण राजीनामा दिला नसल्याची माहिती शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती मिनाज जमादार यांनी दिली.
पंचायत समितीच्या सभापती जमादार यांनी पदाचा राजीनामा द्यावा म्हणून 13 पैकी 12 सदस्यांनी आघाडीचे नेते गणपतराव पाटील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे साकडे घातले होते. या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतली असता त्या बोलत होत्या.
समितीच्या सभापती व उपसभापती पदाची संधी सर्व सदस्यांना मिळावी म्हणून पाच महिन्याचा कार्यकाळ आघाडी अंतर्गत ठरविणार आला होता. 30 डिसेंबर रोजी माझी सभापती पदी निवड करण्यात आली होती. 30 मे रोजी आपण आघाडीचे नेते गणपतराव पाटील यांना प्रत्यक्ष भेटून कार्यकाळ पूर्ण झाला आहे मी राजीनामा देणे असे सांगितले होते असे असताना माझ्यावर जो आरोप केला आहे तो चुकीचा आहे. मी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करीत आले आहे. ज्या त्या भागातील सदस्यांना निमंत्रण देऊनीही ठराविक सदस्यच कार्यक्रमास उपस्थित राहात होते. चार महिन्यापासून कोरोनाचे महामारीचे संकट असल्याने काही सदस्यांना उपस्थित राहता आहे मी समजून घेतले आघाडीचे नेत्यांनी केव्हाही राजीनामा देण्यास सांगितल्यास मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगून जिल्हा परिषदेचा मानाचा शाहू पुरस्कार प्रथमच आपल्या पंचायत समितीत मिळाला आहे सर्व सदस्य व शासकीय अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच हे यश मिळाले आहे. त्याबद्दल आपण समाधानी असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
शिरोळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, मुसा डांगे, अशोकराव कोळेकर यांच्यासह अन्य त्यांनी कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून यासंदर्भात माहिती घेतली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोग यांच्या कडून माहिती घेऊन आपणास कळवू असे सांगितल्याने हा विषय थांबला होता आघाडी अंतर्गत ठरलायापमाने त्यांनी राजीनामा घेऊन आल्या होत्या कायदेशीर अडचणीमुळे थांबण्यास सांगितले होते अशी माहिती काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी दिली.