प्रत्येक संस्थेतर्फे एक किंवा दोन व्यक्तीच अपेक्षित
प्रतिनिधी/ बेळगाव
पत्रकार अशोक याळगी यांचे गुरुवार दि. 10 रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी दुपारी 4 वा. वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावमधील सर्व सांस्कृतिक व सामाजिक संघटनांतर्फे एकत्रित या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तथापि कोविड-19 च्या नियमांचे म्हणजेच सामाजिक अंतर पालन करणे आवश्यक असल्याने प्रत्येक संस्थेतर्फे एक किंवा दोन व्यक्तिच अपेक्षित आहेत. याची सर्व संस्थांनी नोंद घ्यावी. तसेच कोणीही हार-तुरे आणू नयेत, असे आयोजकांनी कळविले आहे.









