केराटोसिस पिलारिसला तोंड देतेय अभिनेत्री
अभिनेत्री यामी गौतमने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. कित्येक वर्षांपासून कधीच बरा न होणाऱया त्वचेचा आजार ‘केराटोसिस पिलारिस’ला तोंड देत असल्याचे यामीने यात नमूद केले आहे.
मी अलिकडेच काही छायाचित्रे काढून घेतली आहेत. माझ्या त्वचेची स्थिती ‘केराटोसिस पिलारिस’ला लपविण्यासाठी माझी छायाचित्रे पोस्ट प्रॉडक्शन्मध्ये पाठविली जाणार होती, ही माझ्यासाठी एक सामान्य प्रक्रिया असल्याचे यामीने म्हटले आहे.

ही समस्या किशोरवयीन असतानाच सुरू झाली होती. यावर अद्याप कुठलाच उपचार नाही. मी कित्येक वर्षे या समस्येला तोंड दिले आहेत. स्वतःची भीती आणि असुरक्षितता दूर करण्याचा निर्णय मी आता घेतला आहे. स्वतःमधील उणीवा पूर्ण मनाने स्वीकार करण्याचे धाडस गोळा करू शकल्याचे उद्गार तिने काढले आहेत. यामीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांपासून अनेक कलाकार तिचे कौतुक करत आहेत.









