ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्री मंडळातील मंत्र्यांची सध्या सर्वत्र जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. केंद्रीय मंत्री मंडळात समावेश असलेले महाराष्ट्रातील चार मंत्रीही या यात्रेनिमित्त जनतेशी संवाद साधत आहेत. या यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात शिवसेना- भाजपामध्ये मोठा संघर्ष उफाळून आला आहे. वादग्रस्त वक्तव्याबद्दल मोठा वाद होऊन नारायण राणेंना अटक, जामीन, सुटका या नाट्यमय घडामोडींनंतरही दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यानंतर राणेंची जन आशीर्वाद यात्रा आता पुन्हा सुरू झाली आहे. यावरुनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधल्या एका सभेत बोलताना या यात्रेवरुन टीकास्त्र सोडले आहे.
राऊत म्हणाले, “आपण नेहमी सभ्यता पाळायची. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. कायतरी जन आशीर्वाद यात्रा निघाली. आपला कोणाला विरोध आहे का? यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा. अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या पण काही जणांनी येड्याच्या जत्रा केल्या असल्याचे सांगत त्यांनी राणेंवर अप्रत्यक्ष निशाना साधला.
पण हा एक अतिशहाणा..
इतर ठिकाणच्या यात्रांचं उदाहरण देत ते म्हणाले, केंद्रीय मंत्री भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील यांनीही यात्रा काढली. पण या तिन्ही मंत्र्यांनी कोणावरही टीका टीप्पणी केली नाही, मुख्यमंत्र्यांवर वक्तव्य केलं नाही. तुम्ही तुमचा विचार घेऊन पुढे चाललेला आहात. मलाही माहितीय प्रधानमंत्री मोदींनी केंद्र सरकार करत असलेल्या कामाची माहिती जनतेला देण्याची जबाबदारी या मंत्र्यावर दिली. पण हा एक अतिशहाणा. ह्याने भाजपाचं ऐकलं नाही. सरकारचा मोदींचा प्रचार न करता शिवसेना, संजय राऊत, महाविकास आघाडीवर टीका केली असल्याचे ते म्हणाले.
Previous Article…तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच : राम कदम
Next Article ISIS-K भारतापर्यंत पोहचण्याची शक्यता








