ऑनलाईन टीम/तरुण भारत
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बेशिस्त वर्तन केल्याच्या कारणावरुन विरोधी पक्षांच्या राज्यसभेतील १२ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निलंबित करण्यात आले. यामध्ये शिवसेनेचे अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. दरम्यान सदस्यांनी माफी मागितल्यास कारवाई मागे घेतली जाणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली होती.
दरम्यान खासदारांनी माफी मागण्यास नकार दिला असून राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू “ज्या सदस्यांनी सभागृहाचा अपमान केला आहे त्यांना कोणताही पश्चाताप झालेला दिसत नाही. त्यामुळे मला वाटलं विरोधकांनी सदस्यांचं निलंबन मागे घेण्याची केलेली मागणी दखल घेण्यायोग्य नाही,” असं वैंकय्या नायडू म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी सर्व खासदारांचं निलंबन नियमाला धरुन असून प्रक्रियेचं पालन करण्यात आलं असल्याचं सांगितलं.