वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरू असलेल्या चौथ्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शनिवारी भारताची महिला नेमबाज यशस्विनी देसवालने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविताना 243.6 गुण नोंदविले. यशस्वीनीने टोकियो ऑलिंपिकसाठी आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे.
पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत ऑस्ट्रीयाचा नेमबाज मार्टिन स्ट्रेंपफी याने विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. त्याने 633.7 गुण नोंदविले. 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत आशिश देबासने दुसरे तर अनिष भनवालाने तिसरे स्थान मिळविले. पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या रूद्राक्ष पाटीलने 251.7 गुणांसह दुसरे स्थान तर विष्णू पंडीयानने 226.7 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. ऑनलाईनवरील या स्पर्धेत एकूण 11 देशांचे नेमबाज सहभागी झाले आहेत.









