ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी 24 महिन्यात मुंबईत 36 बिल्डिंग खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारीकेला होता. तसेच हा 1000 कोटींचा घोटाळा असून, ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभागाद्वारे त्याचा तपास सुरू आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले होते. आता जाधव यांच्यावरील कारवाईच्या पाठपुराव्यासाठी सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत.
सोमय्या यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”यशवंत जाधव यांची 24 महिन्यात 36 मालमत्तांची खरेदी, 1000 कोटींच्या या घोटाळ्याच्या कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत दाखल झालो आहे. यासंदर्भात आज माझ्या काही मिटिंग्ज आहेत.









