नलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेचे नेते (SHIVSENA) आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली. याछापेमारीनंतर काही महत्वाची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यांच्याभोवती कारवाईचा फास आवळताना दिसत आहे. आयकर विभागाने (income tax) यशवंत जाधव यांच्या आणि परिवाराच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत.
यामध्ये यशवंत जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅट आहे. २५ फेब्रुवारीला प्राप्तिकर विभागाने माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या या तपाासदरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आली आहे.
२०१८ ते २००२ दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष असताना यशवंत जाधव यांनी बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या माध्यमातून ही संपत्ती खरेदी केली असावी असा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. तसेच या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झालीय. जप्त केलेल्या ४१ मालमत्तांमध्ये बिल्कवडी चेंबर बिल्डींगमधील ३१ फ्लॅट, भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याचं कळतंय. यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली.