बाळेपुंद्री/ वार्ताहर
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवस्थानात यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना यल्लम्मा डोंगरावर प्रवेशास बंदी राहणार असून भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मंदिराचे कार्यनिर्वाहक रवि कोटारगस्ती यांनी केले आहे.
शनिवार दि 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता घटस्थापनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 24 रोजी खंडेनवमी व 25 रोजी दसरा साजरा होणार आहे. या काळात पारंपरिक पद्धतीने देवस्थानच्या पुजाऱयांच्यावतीने देवीला अभिषेक, होम, विशेष पूजा व आरती आदी कार्यक्रम पार पडतील. कोरानामुळे भाविकांना देवीच्या दर्शनाला 31 ऑक्टोपर्यत बंदी राहणार आहे भाविकांनीनी आपल्या घरातच राहून देवीची आराधना करून पूजा अर्चा करावी. असे आवाहन त्यांनी केले आहे.









