वार्ताहर / हुक्केरी :
चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या मुनी दीक्षास्थळ यरनाळ (ता. हुक्केरी) येथे शांतीस्तंभाचे शनिवार 8 रोजी दुपारी 2 वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दिव्य सानिध्यात आचार्य वर्धमान सागरजी महाराज, श्रवणबेळगोळचे श्री चारुकिर्ती भट्टारक महास्वामीजी असणार आहेत. अध्यक्षस्थानी धर्मस्थळचे धर्माधिकारी विरेंद्र हेगडे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोमगमलजी, राजेंद्रकुमार, श्रीमती निलम, रोहनकुमार, अमिता, रोनक कटारिया परिवार उपस्थित राहणार आहे.









