ऑनलाईन टीम / नोएडा :
यमुना एक्स्प्रेस वेवर आज सकाळी दाट धुक्यामुळे 8 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 3 जण ठार झाले. तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी आग्र्याच्या एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास यमुना एक्स्प्रेस वेवर दाट धुक्यामुळे 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना गाड्यांमधून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांना कल्पना देण्यात आली. हाथरस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. तसेच जखमींना जखमींना एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. काही वेळातच उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.









