बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र आणि आमदार डॉ. यथिंद्र सिद्धरामय्या यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यथिंद्र हे वरुण मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार आणि सिद्धरामय्या यांचे छोटे पुत्र आहेत. सिद्धरामय्या यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









