वार्ताहर / यड्राव
यड्राव तालुका शिरोळ येथील पार्वती औद्योगिक वसाहत मधील एम एस इंटरप्राईजेस मानधना कारखान्याला सकाळी साडेनऊच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने या आगीत सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले या घटनेचा पंचनामा व वर्दी घेण्याची काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस ठाणे मध्ये सुरू होते
यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहत मध्ये सुशील मानधना यांच्या मालकीचा एम एस इंटरप्राईजेस( मानधना )या नावाचा कारखाना आहे सध्या लॉक लॉक लॉक डाउन सुरू असल्याने हा कारखाना बंद होता या कंपनीचा ड्रायव्हर सकाळी साडेनऊ वाजता कंपनीमध्ये गेला असता त्याला मुख्य कार्यालयातून धूर व आगीचे लोड बाहेर पडताना दिसले याची माहिती आणि तात्काळ मालकांना दिली घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर नगरपालिका व संजय घोडावात ग्रुप यांच्याकडून दोन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली या आगीत कार्यालयातील कॉम्प्युटर लॅपटॉप प्रिंटर फर्निचर सिलिंग व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे.








