वार्ताहर / यड्राव
शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कोरॊनाचा पहिला रुग्ण आढळला. अल्फोंनसा स्कूल जवळ गावठाण बेघर वसाहत लगत असलेल्या निर्मळ मळ्यातील 23 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे. निर्मळ मळ्यातील तरुणाला शनिवारी सकाळी ताप व सर्दी त्रास होऊ लागल्याने तो इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात उपचारासाठी गेला.
त्यावेळी त्याचा स्वॅब घेऊन तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे रात्री सांगण्यात आले.
त्यामुळे ग्रामपंचायतीने रात्रीच या परिसरात रिक्षाद्वारे पुकारून नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या. व सकाळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी येऊन सदर परिसर बॅरिकेट्स पत्रे लावून सील करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पी.ए.भाटे यांनी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचा घरातील व आसपास राहणाऱ्या नागरिकांची थरमल टेस्टिंगद्वारे तपासणी केली. व त्या तरुणांच्या संपर्कात असलेल्या आई-वडील यांना आगर येथील स्वॅब तपासणी केंद्रात पाठविण्यात आले.
तर औद्योगिक वसाहतीत ज्या कारखान्यात तो तरुण कामाला होता. तेथील नऊ कर्मचारी त्याच्या संपर्कात आल्याने त्यांना सध्या विलगिकरण करण्यात आले आहे. यड्राव परिसरात प्रथमच कोरोनाचा रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
Previous Articleकोल्हापूर : तिळवणीत एका युवकास कोरोनाची लागण
Next Article उपचारास नकार देणाऱया खासगी रुग्णालयांवर कारवाई करणार








