गतवषीच्या तुलनेत रोप लागवडीचे प्रमाण घटले : 1 लाख 7 हजार रोपे शेतकऱयांना सवलतीच्या दरात मिळणार
प्रतिनिधी / बेळगाव
विकासकामांसाठी होणारी जंगलतोड, वाढत जाणारे काँक्रिटीकरण, वन्यजीव संघर्ष व मृत्यू अशा विविध आव्हानांना तोंड देत वन खात्यामार्फत यंदाच्या हंगामात तब्बल 3 लाख 6 हजार 400 रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबर ऱहास टाळण्यासाठी दरवषी लाखो रोपांची लागवड केली जाते. बेळगाव विभागातील बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल व गोकाकमधील काही भागात ही लागवड होणार आहे. शिवाय 1 लाख 7 हजार रोपे शेतकऱयांना सवलतीच्या दरात वितरित केली जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
गतवषी 6143 हेक्टरमध्ये 37 लाख 34 हजार 100 रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शेतकऱयांना 4 लाख 100 रोपे वितरित करण्यात आली होती. मागीलवषीच्या तुलनेत यंदा रोप लागवडीच्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्हय़ात सर्वाधिक वनक्षेत्र खानापूर तालुक्मयात आहे. या ठिकाणी स्थानिक वातावरण व जमिनीचा पोत लक्षात घेऊन रोप लागवड केली जाणार आहे. खानापूर विभागातील जांबोटी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी जंगल भागात मोठय़ा प्रमाणात लागवड होणार आहे. बांबू, सागवान, बाभूळ, गुलमोहोर, फणस, जांभूळ आदी रोपांचा यामध्ये समावेश राहणार आहे.
गतवषी झालेल्या जोरदार पावसामुळे बरीचशी रोपे नष्ट झाली आहेत. त्या ठिकाणीही नवीन रोपे लावण्यात येणार आहेत. विशेषकरून रोपांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, याकरिता झाडांभोवती बांबूचे कुंपण घातले जाणार आहे. पावसाचे प्रमाण, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, वन्य जीवांच्या संरक्षणासाठी वन खात्यातर्फे दरवषी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला जातो. जुनाट झाडे तोडलेल्या ठिकाणी, सरकारी जागेत, खुल्या जागेत, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गावर रोप लागवड होणार आहे. वन खात्याची हद्द, राज्याची सीमा व जिल्हय़ाची सीमा ठरविण्यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाची
आहे.
बेळगाव विभागातील मच्छे, हलभावी, होसकोटी, शिरूर, खानापूर तालुक्मयातील ओतोळी, सावरगाळी, कणकुंबी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी भागात वन खात्याच्या नर्सरी आहेत. या ठिकाणी रोपे तयार केली जातात. तेथूनच लागवडीसाठी पुरविली जातात. वनखाते विविध प्रकारच्या झाडांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मागीलवषी लागवड केलेल्या रोपांची पाहणी सुरू आहे. रोपांची वाढ व विकास उत्तम असून येत्या पावसाळय़ात ती अधिकच बहरतील, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. शिवाय नष्ट झालेल्या वृक्षांची नोंददेखील वन विभागाकडे असून त्यामुळे रोप लागवडीस मदत होणार आहे.









