प्रतिनिधी/ बेळगाव
पंत बाळेकुंद्री येथे सालाबादप्रमाणे पंत पुण्यतिथी दि. 2 ते 4 नोव्हेंबरदरम्यान साजरी करण्यात येणार आहे. परंतु यावषी कोरोनाचे संकट असल्यामुळे जिल्हाधिकाऱयांच्या विनंतीनुसार साध्या व सांकेतिक स्वरुपात पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.
यासंदर्भात दत्त संस्थानची नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते उत्सव साधेपणाने व सांकेतिक स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोजक्मया सेवेकऱयांच्या उपस्थितीत आमराई परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. यावषी उत्सव साजरा करत नसल्यामुळे उत्सवासाठी कोणीही श्रीक्षेत्री येऊ नये. उत्सव आपल्या घरी नियोजित तारखेदिवशी श्रद्धेने साजरा करावा, असे आवाहन श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्यातर्फे करण्यात आले आहे.









