नवी दिल्ली / वृत्तसंस्था
परतीच्या पावसाने निरोप घेतल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून हळूहळू थंडी जाणवू लागली असून चालू हंगामात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. उत्तर भारताबरोबरच देशाच्या बहुतांश भागात आता थंडीला सुरुवात झाल्याचे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून दिसून येत आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यंदा कडाक्मयाची थंडी पडेल. ला निनाची स्थिती यंदा तीव्र थंडीचा धोका निर्माण करू शकते, असे हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले आहे. शीतलहरीच्या परिस्थितीची मोठी कारणे विचारात घेतल्यास अल निनो आणि ला निना यांची मोठी भूमिका आहे. ला निनाची तीव्रता कमकुवत असल्याने यावषी अधिक थंडी पडू शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
हवामानशास्त्र विभाग दरवषी नोव्हेंबरमध्ये शीतलहरीचा अंदाज देखील जारी करते, ज्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान शीतलहरीच्या परिस्थितीची माहिती दिली जाते. मागील वषी हिवाळय़ात शीतलहरी जास्त काळ होत्या. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शीतलहरीमुळे मोठय़ा प्रमाणात मृत्यू होतात. मृत्यूचे हे प्रमाण यंदाही कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
हवामान बदलामुळे तापमानात वाढ होते असे समजू नये. तापमानात वाढ झाल्यामुळे हवामान अनियमित होते, हे सत्य आहे. ला निना शीतलहरींच्या स्थितीसाठी अनुकूल आहे तर अल निनोची स्थिती यासाठी उपयुक्त नाही. ला निना प्रशांत महासागरातील पृ÷भागाच्या पाण्याच्या थंड होण्याशी संबंधित आहे, तर अल निनो त्याच्या उष्णतेशी संबंधित आहे. या दोन्ही घटकांचा भारतीय मान्सूनवरही प्रभाव जाणवत असतो, असे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.









