बेळगाव :
बेळगाव शहरात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. पुणे आणि मुंबई या पेक्षाही अधिक उत्साहात साजऱया होणाऱया शिवजयंतीला यावषी लॉकडाऊनचे ग्रहण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा घरोघरी शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने गर्दी करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे सामाजिक अंतराचे नियम तोडण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रत्येक शिवप्रेमींनी याची दखल घेण्याची गरज आहे.









