ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात यंदा कडक उन्हाळा असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उकाडा जाणवू लागला असूूून, येत्या काही महिन्यांत देशाच्या उत्तर, वायव्य आणि ईशान्य भागातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. तर पूर्व आणि पश्चिम भागातील दिवसाचे तापमानही नेहमीपेक्षा जास्त असणार आहे. हवामान विभागाने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांसाठी हा उष्णतेचा अंदाज जारी केला आहे.
यंदा दक्षिण आणि मध्य भारत वगळता उत्तर भारतासह देशाच्या बहुतांश भागांतील तापमान नेहमीपेक्षा एक अंशाने अधिक राहू शकते. एक मार्च रोजी उत्तर आणि मध्य भारताचे तापमान नेहमीपेक्षा तीन ते सहा अंशांनी अधिक नोंदवले गेले आहे.
भोपाळ, पश्चिम मध्यप्रदेशात रात्रीचे तापमान अधिक
यंदा भोपाळ, इंदौरसह पश्चिम मध्यप्रदेशात दिवसाचे तापमान 0.5 अंश असेल. तर रात्रीचे तापमान त्यापेक्षा एक अंश अधिक असू शकते. दरम्यान, कोकण, गोवा विभागातही रात्रीच्या तापमानाचा पारा अधिक राहणार आहे.