देवस्थान, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा धार्मिक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धार्मिक परिषदेची बैठक झाली. या पहिल्याच बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले आहे. केंद्र सरकारने अनलॉक 5 ची मार्गसुची जारी केली आहे. त्यानुसार यंदाचा दसरा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कमीत कमी उपस्थितीत व सर्वसरकारी नियम पाळून मंदिरांच्या आवारत सण व उत्सव साजरा करण्यात यावा. या संबंधी जिह्यातील सर्व मंदिरांची पाहणी करुन एक अहवाल तयार करण्यात यावा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, धर्मादाय खात्याचे सहाय्यक आयुक्त रवी कोटारगस्ती, न्यायीक सदस्य योगेश करगुद्री, धर्मादाय तहसीलदार डी. एन. जाधव, श्रीकंठ श्रीपाद जोशी, विठ्ठल भरमा हुब्बळी, जयश्री जाधव, चिंतामनी ग्रामोपाध्ये, विठ्ठल माळी, विनोद दोड्डण्णावर आदी उपस्थित होते.