प्रतिनिधी/ बेळगाव
तुरमुरी कचरा डेपोत वाहनातील कचरा खाली करताना हैड्रोलिक यंत्रात सापडून एका कामगाराचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यासंबंधी रात्री उशीरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कल्लाप्पा बसवंत कांबळे (वय 50, रा. ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द) असे त्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. शहरातून गोळा केलेला कचरा डेपोत खाली करताना हैड्रोलिक यंत्रात सापडून कल्लाप्पाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक मुत्तन्ना सरवगोळ, पोलीस उपनिरीक्षक आनंद व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









