प्रतिनिधी / इस्लामपूर
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत एक हजार हॉस्पिटलचा समावेश असून कोव्हिड दरम्यान उदभवणाऱ्या आजारांवर त्या पॅकेजमधून मोफत सेवा मिळणे आवश्यक आहे. यामध्ये ९७७ सेवांचा समावेश आहे. त्या रुग्णांना मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिल, त्याचप्रमाणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या योजनेतील हॉस्पिटलच्या नावाचे फलक चौका-चौकात लावण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा वेळी खाजगी डॉक्टर यांनीही मागे राहू नये. इंडियन मेडिकल असोसिएशनने सुरक्षेबाबत काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने विमा कवचाची मागणी केली होती. त्याचा विचार करुन सेवा बजावताना दुर्दैवाने डॉक्टरांना प्राण गमवावा लागल्यास त्यांना ५० लाखांपर्यंत विमा कवच देण्यात येईल. त्यामुळे त्यांनी यापुढे आरोग्य सेवेत अग्रेसर रहावे.
सेवा बजावताना त्यांच्यावर हल्ले झाल्यास शासनाने कलमात बदल केले असून डॉक्टरांना पूर्ण सुरक्षितता देण्यासाठी गृहविभागाला सूचना दिल्या आहेत. शासनाने मास्क, सॅनिटायझर याच्या भावावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. येत्या चार-सहा दिवसात त्याबाबत निर्णय होईल. इस्लामपुरात टाटा ट्रस्टच्या सहयोगाने उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये सर्व अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. या हॉस्पिटलचा चेहरा बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








