वार्ताहर / मडकई
फोंडय़ाचे म. गो. पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांना डोंगर कापण्याखाली नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱयांनी गुन्हा नोंदवून केलेली अटक ही हेतूपूरस्सर व राजकीयदृष्टय़ा झालेली असून, या घटनेचा निषेध म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, कार्यकारी समीती, कार्यकर्ते व हीतचिंतकांनी प्रसिध्दी पत्रकातून केलेला आहे.
प्रत्येक गोमंतकीय माणूस स्वतःचे स्वतंत्र घर बांधण्याचे मनसुबे बांधत असतो डॉ. भाटीकर यांनी कवळे पंचायत क्षेत्रात याच उद्देशाने 300 चौरस मिटरच्या भूखंडात स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहीले. या डोंगर परिसरात अनेक नागरीकांची घरे आहेत. उतंरडीच्या हा भूखंडाला समपातळीवर आणण्यासाठी त्यातील माती उपसणे गरजेचे होते. सरकारी काम करणाऱया एका ठेकेदाराला सरकारी कामासाठीच मातीची आवश्यकता होती. त्या ठेकेदारांने कवळे येथील असलेल्या भूखंडातील माती काढण्याचे म. गो. नेते डॉ भाटीकर यांना विचारले असता त्यांनी परवनगी दिली. अनवधाने त्यांच्या कडून ही चूक घडली. अनवधनाने घडलेल्या चुकीसाठी त्यांच्यावर दंडत्मक कारवाई करता आली असती. मात्र तसे न करता काहीं राजकीय नेत्यांनी हेतुपूरस्सर राजकीय वजन वापरून त्यांना अटक करण्यास भाग पाडले. या घटनचा म. गो निषेध करीत असल्याचे या पसिध्दी पत्रकातून स्पष्ट केले आहे. खंडपाबांध येथे असलेला डोंगर कापतांना कित्येक वृक्षांची कत्तल करण्यात आली. बेकायदा डोंगर कापणी व वृक्षांच्या कत्तलींने निसर्गांचे सोंदर्यीकरण नष्ट केले. बेकायदा कत्तली करून अनेकांनी घरे बांधली. मोठं मोठय़ा इमारतीही उभारल्या. त्यावेळी अशाच प्रकारच्या रितसर तक्रारी करून गुन्हा नोंदवून संबंधीताना कोणीही अटक केली नाही. हा भाग पिडीए. नगरनियोजन खात्याने सेंटलमॅन्ट झोनात टाकला. कुर्टी सारख्या भागातही डोगर कापल्यामुळे निसर्गांची हानी झाली. फोंडय़ातील नागरी न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या भुखंडाचे प्रकरण उच्च न्यायालयात असताना न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरही हा डोंगर कापला गेला. अशी किती तरी प्रकरणे फोंडयात घडलेली आहे. मात्र याकडे जाणूनबजून याकडे कानाडोळा केला. सरकारने या सर्व प्रकराणाचा योग्यरीतीने सोक्षमोक्ष लावण्याची मागणी म गो पक्षाने या प्रसिध्दी पत्रकातून केलेली आहे.









