वार्ताहर / कंग्राळी खुर्द
महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे रविवारी कंग्राळी खुर्द येथे हुतात्मा मारुती बेन्नाळकर आणि बाळू निलजकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस एल. आय. पाटील, कंग्राळी खुर्द ग्रामविकास आघाडीचे अध्यक्ष आर. आय. पाटील, जि. पं. सदस्या माधुरी हेगडे, सुधीर चव्हाण यांच्यासह तालुक्यातील सीमावासियांनी हुतात्म्यांना पुष्पहार आणि पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी महात्मा फुले मंगलकार्यालयामध्ये आदरांजलीपर सभा घेण्यात आली. या आदरांजली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर, संतोष मंडलिक, माधुरी हेगडे, इंदुमती बेन्नाळकर, अनंत निलजकर, आर. आय. पाटील, ऍड, एम. जी. पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक एल. आय. पाटील यांनी केले. यावेळी कृष्णा हुंदरे, ऍड. सुधीर चव्हाण, संतोष मंडलिक, शुभम शेळके, अनंत निलजकर, आर. आय. पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर यांची आदरांजलीपर भाषणे झाली. यावेळी जि. पं. सदस्या माधुरी हेगडे यांच्याहस्ते हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या कन्या इंदुमती बेन्नाळकर यांना साडी-चोळीचा आहेर देण्यात आला.
यावेळी एपीएमसी सदस्य तानाजी पाटील, आर. के. पाटील. मोनाप्पा पाटील, शिवाजी खांडेकर, मल्लाप्पा पाटील, जोतिबा आग्रोळकर, मारुती लोहार, नानू पाटील, वसंत सुतार, परशराम गीरीजे, विलास घाडी, राजू किणेकर, एम. जी. पाटील, बी. डी. मोहनगेकर, अनिल पाटील, विनायक पाटील, संजय पाटील, प्रमोद पाटील, सुभाष मरुचे, अनिल हेगडे, नागेश किल्लेकर, प्रेमा जाधव, मनोहर होसुरकर, माणिक होनगेकर, रुक्मिणी निलजकर, मनोहर निलजकर, राम निलजकर, परशराम निलजकर, संभाजी पाटील आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तिने पाळला बंद
कंग्राळी खुर्द : भाषावार प्रांतरचनेनंतर सीमाभागातील 865 खेडी अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर राज्यात डांबले. 1956 नंतर सीमाभागात अनेक आंदोलने झाली. त्या आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली वाहून सीमावासीय आज 17 जानेवारी हा दिन हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. कंग्राळी खुर्द येथील पैलवान हुतात्मा मारुती बेन्नाळकर हे 1956 सालच्या पहिल्या आंदोलनात पहिले हुतात्मे झाले. तेव्हापासून आजपर्यंत कंग्राळी खुर्द ग्रामस्थ हा दिवस गांभीर्याने पाळतात. 17 जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त सकाळी 9 वाजता कंग्राळी खुर्द येथील हुतात्मा चौकामध्ये हुतात्मा मारुती बेन्नाळकर आणि हुतात्मा बाळू निलजकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कंग्राळी खुर्दसह परिसरातील व्यावसायिकांनी आपले सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तिने बंद ठेवून आपल्या महाराष्ट्रात जाण्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यामुळे नेहमी गजबजलेला महादेव रोड परिसर सकाळपासून सामसूम दिसत होता.









