1 नोव्हेंबर 2016 चा खटला
प्रतिनिधी /बेळगाव
1 नोव्हेंबर 2016 रोजी मूक सायकल फेरी काढण्यात आली होती. दरवषीप्रमाणेच ही मूक सायकल फेरी काढण्यात आली होती. त्यादिवशी काकेरू चौक, शहापूर येथील लाल-पिवळय़ा रंगाच्या पताक्मया तोडल्या म्हणून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उशिराने यावर समन्स बजावण्यात आले होते. याप्रकरणी सर्वांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आता पुढील सुनावणी 7 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
म. ए. समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर रोजी मूक सायकल फेरी काढली जाते. यामध्ये मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित असतात. त्यादिवशी लाल-पिवळय़ा रंगाच्या पताका फाडल्या म्हणून दीपक दळवी, महेश पाटील, रामचंद्र पाटील, गजानन कोटे, राघवेंद्र येळ्ळूरकर, लोकनाथ रजपूत यांच्यावर शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. जेएमएफसी तृतीय न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन 10 हजार रु. वैयक्तिक हमीपत्र व तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार या अटींवर सर्वांना जामीन मंजूर झाला आहे. या सर्वांतर्फे ऍड. महेश बिर्जे, ऍड. बाळासाहेब कागणकर, ऍड. रिचमॅन रिकी यांनी काम पाहिले.