म्हैसूर//प्रतिनिधी
म्हैसूरमध्ये शुक्रवारी रात्री एका ३२ वर्षीय आरोग्य अधिकाऱ्याचे आरोग्यविषयक समस्येमुळे निधन झाले. चंद्रशेखर हे तिरुमाकुडालू नरसिपुरा शहरातील रहिवासी होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर म्हैसूरमधील जिल्हा आरोग्य कार्यालयात (डीएचओ) कार्यरत होते. ऑफिसवरून घरी पोहोचल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला. मात्र या अधिकाऱ्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.









