म्हैसूर/प्रतिनिधी
आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांनी मंगळवारी म्हैसूरच्या नवीन उपायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान सिंधुरी यांनी चामुंडेश्वरी मंदिराला भेट दिली आणि देवीचे दर्शन घेतले. २००९ बॅचच्या सिंधुरी धार्मिक व धर्मादाय वेतन आयोगाच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. तात्यांनी मंड्या जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, हसन उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.
कर्नाटक सरकारने सोमवारी उपायुक्त बी. शरत यांची बदली झाली. आता त्यांच्या जागी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांना सोमवारी नियुक्त केले आहे.









