बेंगळूर/प्रतिनिधी
म्हैसूर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शहरात चीनी उत्पादनांची विक्री व विक्रीला परवानगी देऊ नये, यासाठी उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱयांना निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर कार्यक्रमास पाठिंबा मिळावा यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे हे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाचा म्हैसूर दसरा उत्सव १७ ते २७ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. उत्सवाच्या काळात दरवर्षी अंदाजे १० लाख लोक म्हैसूरला भेट देतात. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर उत्सव कमी प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.









