बेंगळूर/प्रतिनिधी
म्हैसूर पॅलेस सिटी येथे दहा दिवस चालणाऱ्या दसरा महोत्सवाची सुरुवात शनिवारी धार्मिक उत्साहाने झाली. डॉ. सी.एन. मंजुनाथ आणि मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी चामुंडी टेकडीवरील चामुंडेश्वरी देवीच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करत दसरा महोत्सवाचे उद्घाटन केले.
कोरोना साथीच्या छायेत असलेल्या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कोरोना चाचणीचे नोडल अधिकारी डॉ. मंजुनाथ यांना त्यांच्या सेवांच्या सन्मानार्थ उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान यावेळी सहा कोरोना वॉरियर्सना देखील विशिष्ट सेवा दिल्याबद्दल गौरविण्यात आले.
राज्यात कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने ४१० वा म्हैसूर दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.










