बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना लसीकरण होत असून लसीच्या कमतरतेमुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. दरम्यान म्हैसूरच्या रहिवाशांसाठी स्पुतनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. स्पुतनिक व्ही लसीचा डोस देण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ही लस निवडक खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध असेल.
स्पुतनिक व्ही लसीच्या लसचा प्रत्येक डोस १,२५० रुपयांना उपलब्ध होईल, अशी माहिती खासगी रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. अपोलो हॉस्पिटलमार्फत ही लस बेंगळूरमध्ये दिली जात आहे. ३४ लाख लोकसंख्या असलेल्या म्हैसूरमध्ये रशियन लसीच्या आगमनाने लसीची व्याप्ती वाढेल अशी अपेक्षा आहे. १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्वांना स्पुतनिक व्ही देण्यात येईल. सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन दोन खाजगी रुग्णालयात देण्यात येत आहेत.









