म्हैसूर/प्रतिनिधी
म्हैसूरमध्ये एका युवकाला डेल्टा-प्लस कोरोना B.1.617.2.1 or AY.1. चा संसर्ग झाल्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी बुधवारी सांगितले होते. “बेंगळूर येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस येथे २२ जूनपर्यंत डेल्टा-प्लस व्हेरिएंटची तपासणी केली असता दोन नमुन्यांचे अहवाल सकारात्मक आले होते. आता म्हैसूरमध्ये डेल्टा प्लसचे चार रुग्ण असल्याचे डीसी डॉ. गौतम बागडी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कर्नाटकने बुधवारी राज्यात डेल्टा प्लस प्रकारातील पहिल्या दोन घटनांची पुष्टी केली होती आणि त्यातील एक रुग्ण राजधानी बेंगळूरमधील असल्याचे म्हंटले होते. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी, ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिली गेली असून पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन केले जात आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.