जलसिंचन सल्लागार समिती सदस्य मनोज शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी / मिरज
सध्या उन्हाची दाहकता वाढली आहे. यामुळे शेतीला पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणुन येत्या दोन दिवसात म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करणार असल्याची माहिती मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जलसिंचन सल्लागार समितीचे सदस्य मनोज शिंदे – म्हैसाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उन्हाळाची तीव्रता दिवसे-दिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर व कुपनलिकाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घटत चालली असून पाण्याविना पिके वाळू लागली आहेत. म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी दुष्काळ भागातील शेतकरी व ग्रामपंचायतीने कृष्णा कोयना उपसा जलसिंचन योजनेचे सल्लागार समितीचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्याकडे केली होती.
शेतकऱ्यांचा हा प्रश्न मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचाकडे मांडला होता. त्यानंतर जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी पांटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.आता दोन दिवसात आवर्तन सुरू होणार असून, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा मार्गी लागणार असल्याचेही मनोज शिंदे यांनी मागितले.








