प्रतिनिधी / मिरज
मिरज-कर्नाटक सीमेवर एमएच 14 बीटी 1078 या एस.टी.वर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी चालक चंद्रकांत पांडुरंग सुतार यांनी अज्ञाताविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शनिवारी मिरज आगारातून दोन एस.टी. गाड्या कर्नाटक सिमेपर्यंत सोडण्यात आल्या. एका गाडीच्या दोन फेर्या झाल्या होत्या. तोडफोड करण्यात आलेल्या गाडीची चौथी फेरी सुरू होती. ही गाडी म्हैसाळ ते कर्नाटक सिमेच्यामध्ये गेली असता सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एस.टी.वर समोरुन दगडफेक केली. यावेळी वाहक बाजुकडील काच फुटली. त्यानंतर एस.टी. कर्नाटक सीमेपर्यंत रवाना करण्यात आली. त्या ठिकाणी प्रवाशांना उतरुवन रात्री उशिरा ती गाडी मिरजेत दाखल झाली.








