प्रतिनिधी/मिरज
म्हैसाळ बंधाऱ्यात पोहण्यासाठी उडी मारल्यानंतर बेपत्ता झालेल्या उजेब उर्फ मुजमिल अल्ताफ मुजावर (वय 22, रा. देवताळे मळा, पूर्व म्हाडा कॉलनी मिरज) या तरुणाचा मृतदेह सापडला. दोन दिवस आयुष्य हेल्पलाईन टीम आणि विश्वसेवा फाऊंडेशनचे जवान त्याचा शोध घेत होते.
मुजमिल याचा मृतदेह म्हैसाळ बंधाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या पंपगृहजवळ खोल पाण्यात बुडाला होता. बोटीच्या साहाय्याने शोधकार्य सुरू होते. गुरुवारी सकाळी मुजमिल याचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना आढळून आला. त्याला जीवरक्षक दल, अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.








