वार्ताहर/म्हासुर्ली
म्हासुर्ली (ता.राधानगरी) येथे नव्या झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी ठेकेदाराने खुदाई केल्याने नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईप फुटल्या आहेत.परिणामी गेल्या पंधरा दिवसा पासून ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवण करावी लागत असून ठेकेदार सदर पाईप लाईन बसविण्यासाठी चालढकल होत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत असून ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
म्हासुर्लीसह, कुंभारवाडी, अस्वलवाडी, झापाचीवाडी या गावांना पिण्याच्या पाण्याची कोट्यावधी रुपये खर्चून सुमारे दहा वर्षापूर्वी संयुक्त नळ पाणी योजना कार्यान्वित करण्यात आल्याने सदर वाड्या वस्तीमधील पाणी प्रश्न सुटण्यास हातभार लागला आहे.
मात्र म्हासुर्लीसह धामणी खोऱ्यातील गावांना चांगली आरोग्य सेवा उपल्बध व्हावी यासाठी शिवसेना आमदार यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून म्हासुर्ली येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्यात आले आहे. तर सध्या सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी संबंधित विभाग व ठेकेदाराने गावच्या मुख्य पाणी पुरवठा योजनेच्या टाकी जवळ मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून जेसीबी मशीनव्दारे खुदाई सुरू केली आहे. मात्र सदर कामासाठी खुदाई करत असताना ठेकेदारांने योग्य ती दक्षता न घेता काम चालू केले.परिणामी खुदाई मध्ये गावच्या नळ पाणी योजनेच्या पीव्हीसी सापडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे गावचा पाणी पुरवठा सुमारे पंधरा दिवसा पासून बंद पडला आहे.
सदर ठेकेदाराने पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्ती बाबत गेल्या दहा बारा दिवसा पासून चालढकल केल्यान ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून ठेकेदाराच्या मनमानी कारभारा बदल ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन गावचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी लक्ष द्यावे अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








