सांगरूळ / वार्ताहर
म्हारुळ ( ता . करवीर ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या माजी आमदार चंद्रदीप नरके गटाच्या रूपाली मोहन चौगले यांची बिनविरोध निवड झाली .ग्रामपंचायत सदस्यांची बैठक मंडल अधिकारी एस.एस गोदे यांचे अध्यक्षतेखाली होऊन वरील बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील वर्षी झालेली ग्रामपंचायतीची निवडणूक गावातील सर्व गटांनी एकत्र येऊन बिनविरोध केली होती . सरपंच सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून सुकाणू कमिटीने बिनविरोध निवडीवर ठरवलेल्या सूत्रानुसार सरपंच वंदना म्हाकवेकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते .या पदावर रूपाली चौगले यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच सागर चौगले, सदस्य सरदार पाटील, राजाराम कुंभार, प्रकाश कांबळे, अलका पाटील, वंदना म्हाकवेकर, रेखा कुंभार, शालाबाई गुरव, ग्रामसेवक पी.एस. मेंगाने, तलाठी सुनीता भोईर व सुनिता पाटील ,पोलीस पाटील सागर कुंभार यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
या बिनविरोध निवडीनंतर नूतन सरपंच रूपाली चौगले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी करवीरचे माजी सभापती रवींद्र मडके, एकनाथ चौगले, सरदार मोहिते-पाटील, रंगराव पाटील, आनंदा शिंदे, आण्णा चौगले, तानाजी पाटील, नामदेव पाटील, सरदार कुंभार, नागनाथ मगदूम, रवींद्र चौगले, राजाराम पाटील, शिवाजी पाटील, भरत सुतार, पांडुरंग चौगले, भैरू पाटील, एन.के.पाटील, बदाम पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.