प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा सबयार्डमध्ये बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान दोन गटात जागेच्या वाटपावरून झालेल्या भांडणात मुस्लीम बांधवांच्या एका जामावाने समेमुल्ला मेहबुबसाब हकीम (वय 46) रा. गावसवाडा म्हापसा यांना लोखंडी सळी, लाथाबुक्यानी मारहाण करून जबर जखमी केले. या घटनेत समेमुल्ला हा जबर जखमी झाला असून रक्तबंबाळ अवस्थेत त्याला म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार म्हापसा सबयार्डमध्ये दोन गटात जागेच्या वाटपावरून दररोज भांडणे व्हायची. या रागाच्याभरात सलीम दारूगर, देवर दारूगर, हजाब अल्ली रा. मरड म्हापसा तसेच अरबाज व अन्य साथीदारांनी जमाव करून लोखंडी सळय़ांनी व लाथाबुक्यानी समेमुल्ला हकीम याच्या डोक्यावर वार केले. त्यात रक्तबंबाळ अवस्थेत समेमुल्ला खाली कोसळला त्यानंतर जमावाने तेथून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत समेमुल्ला याला म्हापसा जिल्हा आझिलोत दाखल करण्यात आले. म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून म्हापसा पोलिसांनी 504, 341, 324, 506 (घ्घ्) भा. द. संहितेच्या कलम 34 अन्वे हा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक विराज कोरगावकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









