प्रतिनिधी /म्हापसा
क्षेत्र विठ्ठलवाडी म्हापसा येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानात सोमवार दि. 15 रोजी कार्तिकी महाएकादशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी दिली आहे.
रविवार दि. 14 रोजी सकाळी लघुरुद्र, महापूजा, महाआरती व सायं. 7.30 वा. सुश्राव्य भजन होईल. दि. 15 रोजी कार्तिकी महाएखादशी उत्सवानिमित्त पहाटे 5.30 वा. काकड आरती, महाभिषेक व महापूजा, सकाळी 8.30 ते दु. 12 पर्यंत महिला भाविकांतर्फे स्वहस्ते अभिषेक, भजन, सायं. 5 वा. श्री विठ्ठल रखुमाईची लालखी वार्षिक वहिवाटीप्रमाणे नगरप्रदक्षिणेस निघणार आहे. नगरप्रदक्षिणाच्यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांकडून ओटी व फळ फळावराची आरती स्विकारली जाईल. तसेच लालखी सोहळय़ाच्या अनेक ठिकाणी पावणी करण्यात येणार आहे. विठ्ठलवाडी युथ असोसिएशन व देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने 47 वी अखिल गोवा पातळीवरील रांगोळी स्पर्धा (पोटरेट व डिझाईन) या गटात होईल. आकाश कंदील व नवरो सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा विठ्ठलवाडी येथे रात्री 9 ते 12.30 पर्यंत होईल. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी शुभम म्हापसेकर-878851740, सदानंद दिवकर, प्रसाद कवळेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष ओमकार फळारी यांनी केले आहे.









