एका संशयिताला अटक
प्रतिनिधी / पणजी
अमली पदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांनी म्हापसा गिरी येथे केलेल्या कारवाईत 1 लाख 10 हजार रुपये किमंतीचा ड्रग्स जप्त केला आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयिताला आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव मितलेश रामचंद्र दास (21) संशयित मुळ बिहार येथील असून गेली काही वर्षे तो गोव्यातील कामुर्ली येथे राहत आहे. संशयित गिरी चर्च जवळ ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून संशयिताला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून 1 किलो 100 ग्राम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई 2,5 ते 4.40 दरम्यान करण्यात आली आहे. एएनसीचे उपनिरीक्षक रोहन मडगावकर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरु आहे.









