प्रतिनिधी/ म्हापसा
राज्याच्या महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी मंगळवारी दुपारी म्हापसा पेडे येथे ठेवण्यात आलेल्या बिगर गोमंतकीयांना तसेच म्हापसा मारुती मंदिर, सर्वेवाडा गिरी, काणका सर्कल जवळ जाऊन स्वतःहून गरजू व बिगर गोमंतकीय नागरिकांना स्वतःच्या हाताने भोजन वाढले. आपण मंत्री असल्याचा मोठेपणा न बाळगता,जे कोण गरजवंत यांसाठी मदत करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात म्हापश्यात स्वतःहून गरजू, होतकरू व बिगर गोमंतकीय नागरिकांना दुपारचे भोजन वाडीत असल्याची माहिती वाऱयासारखी पसरल्यावर पत्रकारांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांनी आपल्यास प्रसिद्धी नको उलट आपले फोटोही काढू नका असा समज पत्रकारांना दिला. आपण हे जे काही करीत असल्याचे प्रसिद्धीमुळे नव्हे तर माणुसकीच्या दृष्टीने त्यांना अन्नदान देण्याचे काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
एक मोठा टेम्पो भरून जेवण आणण्यात आले होते, त्यात भात बटाटय़ाची भाजी, आमटी, सलाद
आणि मुगाची खीर असे जेवण प्रत्येकाला वाटण्यात आले. पेढे म्हापसा येथे सुमारे 180 जणांना भोजन. म्हापसा मारुती मंदिराजवळ सुमारे पन्नास जणांना, गिरी बार्देश येथे पन्नास जणांना तर काणका सर्कल जवळ सुमारे 500 लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे कोणालाही न जुमता मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी स्वतःहून त्या बिगर गोमंतकीयांना आपल्या हाताने भोजन वाढले. म्हापसा भोवताल परिसरात मंत्री मोन्सेरात जेवण देते अशी माहिती बिगर गोमंतकीयांना मिळाल्यावर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन घरातील मोठी मोठी भांडी आणून जेवणाचा आस्वाद घेतला शिवाय काणका येथील वैष्णवी टी स्टॉल चे मालक विनेश साळगावकर यांच्याकडे त्या गरजू लोकांना वाटण्यासाठी तांदळाच्या पिशव्या दिल्या. जेणेकरून प्रत्येकाला दोन किलो प्रमाणे तांदुळ वाटण्याचा आदेश दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तप्रसाद नानोडकर, हवलदार प्रकाश पोवळेकर यावेळी जातीने लक्ष ठेवून होते.
अनेकजण मदतीस सरावले.
दरम्यान वेर्ला काणका पंचायतीचे सरपंच मिल्टन मार्किस यांच्यावतीने पंचायतीत वेर्ला काणका गावच्या
नागरिकांसाठी फळे, भाजी व मासे विक्री करण्याचा मेळावा वेर्ला काणका साईनगर मैदानावर आयोजित केला होता. तेथील गरजू लोकांनी त्याचा फायदा मोठय़ा प्रमाणे घेतला. त्यानंतर काणका डिमेलो वाडा येथे नितीन लिंगुडकर यांच्या घरा नजिक फळे भाजी स्वस्त दरात वितरित करण्यात आली. सेवाभावी संस्थेचे योगेश पाडलोस्कर यांनी ही सेवा त्यांना दिली. काही गरजुवंतांना सरपंच मिल्टन मार्किस यांनी किराणा साहित्य आणि भोजन दिले.
म्हापशातील समाजसेवक शेखर नाईक यांनी आपल्या स्वखर्चाने म्हापसा भोवताल परिसरातील गरजू व होतकरू नागरिकांना मोफत तांदूळ, पीठ भाजी व बिस्किट आधी सामान वितरित केले. इतर सेवेपेक्षा गरिबांना यावेळी मोफत देणे ही खरी आणि मोठी समाजसेवा असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान सोनारवाडा काणका येथील साई किरण डेव्हलपर्सचे मालक दत्ताराम पेडणेकर यांनी, गावातील नागरिकांना दोन किलो पीठ, रवा, तांदूळ, कांदे, बटाटे, अंडी आदी सामान वितरित केले. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. काणकाचे पंच सागर लिंगुडकर यांनी काणका गावात फलोत्पादन महामंडळातर्फे मोफत भाजी वितरित केली. पंच बाळा नाईक यांनी काणका बांध गावात बटाटे, कांदे आणि टमाट यांची सोय करून गावात वितरीत केले.









