प्रतिनिधी / पणजी :
कर्नाटकाने म्हादई जिंकली असून गोवा सरकार व मुख्यमंत्री म्हादईचे पाणी कर्नाटकाला न देण्यास अपयशी ठरले आहे. कर्नाटकाच्या अर्थसंकल्पामध्ये कर्नाटक सरकारने खास म्हादई प्रकल्पासाठी 500 कोटीची तरतूद केली आहे. अजूनही सरकारला म्हादई विषयी लोकांची फसवणूक करायची असेल तर त्यांनी म्हादईची लढाई कशी जिंकणार या विषयी जाहीर चर्चा करावी गोवा फॉरडर्च सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्याने सादर केलेली याचिका न्यायालयात सादर झाली नाही. मुख्यमंत्री सध्या जिल्हापंचायत निवडणूका असल्याने लोकांना म्हादईविषयी खोटी आश्वासने देत आहे sत्यांना म्हादईचे एवढे गांभिर्य असते तर ते आज जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीत प्रचार न करता आज दिल्लीत ठाण मारुन बसले असते. गोवा भाजप सरकारला दिल्लीत किंमत नाही. अजूनही मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याची भेट घेऊन म्हादईवर चर्चा केली नाही. जलशक्ती मंत्र्यासोबतही चर्चा झाली नाही. कर्नाटक विधेयकाने एका दिवसात आपले सर्व परवाने मिळविले आहे. पेंद सरकार गोवा सरकारला केमत देत नसल्याचे स्पष्ट होते असे विजय सरदसाई म्हणाले.
कारोना विषयी सरकार गंभिर नाही
सध्या जगभर कोरोना वायरस पसरत आहे. सर्व देशानी आपआपल्या देशातील सुरक्षा वाढविली आहे. विमानतळावर देशी विदेशी पर्यटकांची तपासणी केली जाते. पण गोव्यात विमानतळावर फक्त कोरोना विषयी फलक लावले आहे या ठिकाणी कसलीच तपासणी केली जात नाही. उलट गोव्याचे मंत्री म्हणतात कोरोनामुळे पर्यटक गोव्यात sयेत आहे. पण हेच पर्यटक गोव्यात कोरोना वायरस आणू शकतात त्यामुळे सरकारने याची दखला घेतली पाहिजे. सर्व देशी विदेशी पयंटकांची तपासणी केली पाहिजे, असे यावेळी विजय सरदसाई म्हणाले.
जिल्हा पंचयत निवडणूक ही फिक्सांग
सध्या राज्यात जिल्हापंचायतीचे वारा वाहत आहे. पण काही मतदारसंघात भाजपचे बिनविरोध उमेदवार येत आहे. गोव्यात विरोधी पक्ष आपला उमेदवार जाहीर करत नाही यावरुन दिसून येते ही निवणूक म्हणजे फिक्सींग आहे. आम्ही या निवडणूकीत आमचे उमेदवार ठेवले नाही. जर आम्ही ठेवले तर कॉग्रेसची आलपा मते फोडली असी म्हटले असते. आता कॉंग्रेसने या निवडणूकीत काही ठिकाणी आपले उमेदवार ठेवले नसल्याने आच्छर्य वाटत आहे असेही यावेळी विजय सरदेसाई म्हणाले.