वाळपई / प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पडणाऱया पावसामुळे पडझड होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला असून काही ठिकाणी वीज वाहिन्यावर झाडे पडल्यामुळे जवळपास एक लाख रुपयांची नुकसानी झालेली आहे.सध्यातरी डोंगराळ भागांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे म्हादई नदी ,वाळवंटी नदी रगडा नदी आदींच्या पाण्याची पातळी धोकादायक अवस्थेत पहावयास मिळत आहे .रात्रभर पाऊस लागल्यास मोठय़ा प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
वाळपई अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याचे प्रकार घडले .वाळपई होंडा दरम्यानच्या गुळेली याठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयात गेल्या चार दिवसांपासून धुवांधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेकवेळा रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार घडताना दिसत आहे .गेल्या दोन दिवसापासून पावसाचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.
रस्त्यावर झाडे पडण्याचा प्रकार.
वाळपई अग्निशमन सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात एकूण दहा ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याचा प्रकार घडला. याबाबत देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार नगरगाव पंचायत क्षेत्रातील ब्रह्मकरमळी खोतोडा पंचायत क्षेत्रातील पाटवळ,घोलकरवाडा पंचायत क्षेत्रातील अडवई व म्हाऊस पंचायत क्षेत्रातील कोपर्डे याठिकाणी झाड पडल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला व्यत्यय निर्माण झाला .अग्निशामक दलाच्या यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन रस्ते मोकळे करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
वीज खात्याची 1 लाखांची नुकसानी.
वाळपई वीज कार्यालयाचे सहाय्यक अभियंता दीपक गावस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात वीज वाहिन्यांची मोठय़ा प्रमाणात नुकसान झाली आहे. एकूण दहा विजेचे खांब मोडले असून एक लाखाच्या आसपास
वीज यंत्रणेचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्यातरी सत्तरी तालुक्मयाच्या सर्व भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झालेला नाही. ज्याठिकाणी खांब मोडलेले आहे त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा करण्यात आलेला आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
अनेक नद्यांची पातळी धोकादायक वळणावर.
गेल्या दोन दिवसापासून व आज सकाळपासून प्रचंड प्रमाणात पाऊस लागत आहे .खासकरून डोंगराळ भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे वाळवंटी, म्हादई रगडा आदी नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्मयाच्या रेषेपर्यंत पोहोचू लागली आहे. रात्रभर अशाच प्रकारे पाऊस लागल्यास सत्तरी तालुक्मयांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. दरम्यान याबाबत वाळपई जलसिंचन खात्याचे सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की म्हादई नदीच्या पाण्याची पातळी धोक्मयापर्यंत पोहोचू लागली आहे. त्याचप्रमाणे रगडा वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली असल्यामुळे काही प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे.
वाळवंटी नदीच्या पाण्यातही वाढ झालेली आहे .यामुळे घोटेली भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कोणत्याही क्षणी पाण्याची पातळी आणखी वाढल्यास घरामध्ये पाणी घुसण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
अंजुणे धरणाच्या पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी.
अंजुणे धरणाच्या पाण्याची पातळी आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू लागली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही पाती सध्यातरी 88.67 मी. झाली असून आज रात्री सदर पातळी 89 मीटर ओलांडल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. जलसिंचन खात्याने यासंदर्भात सतर्कता जाहीर केलेली आहे .
दरम्यान याबाबत देखरेख ठेवण्यासाठी अनेक अधिकाऱयांची नियुक्ती केलेली आहे. सदर अधिकारी 24 तास सदर परिसरात देखरेख ठेवणार असून गरज पडल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्याचे आदेश अधिकाऱयांकडून देण्यात येणार आहेत.
नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी वर्गात राम गावस,गौरीश म्हाळशेकर,पवन वरक,सतिशकुमार सावंत, नरेश पोकळे,विनोद भंडारी, अनिल फडते,समिर गावस,दिलिप गावकर, शंभर पाटील, पुंडलिक गावस,अख्तर करोल,सुनिल राणे यांचा समावेश आहे.
अनेक भागांत पाणी घुसले.
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सत्तरी तालुक्मयाच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. नाणूस येथे गोशाळेच्या परिसरामध्ये पाणी घुसले आहे. त्याचप्रमाणे कुडशे, सोनाळ, धारखण आदी भागातही मोठय़ा प्रमाणात पाणी घुसल्याची माहिती हाती आलेली आहे.









