आमदार सुदिन ढवळीकर यांचा आरोप
वार्ताहर / मडकई
म्हादई संदर्भात गोवा सरकारने दिलेले आश्वासन पोकळ ठरले असून केंद्रात भाजपचे सरकार असूनही गोव्यावर ही दुर्देवी परिस्थीती ओढवलेली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर व जलस्त्राsतमंत्री श्री. जोशी यांच्या गोव्यासंबंधी अनास्थाताच यातून दिसून येते, अशी टिका पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर केली आहे.
म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी बांधण्यात 500 कोटी खर्चून बांधण्यात येणारा प्रकल्प कर्नाटक सरकार पुर्णत्त्वास नेईल, असे जोशी ठामपणे सांगतात. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हादई विषयाची अवमान याचीका दाखल केल्याचे सांगतात. केंद्रात, कर्नाटकात व गोव्यात या तिन्ही ठीकाणी भाजपचेच सरकार असूनही म्हादईचा प्रश्न सुटू नये हा मोठा विनोद म्हणावा लागेल. याचाच अर्थ केंद्रात कर्नाटकचे वजन आहे व गोव्याला काडीमात्रही महत्त्व दिले जात नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हादईच्या कटकारस्थानात सामील असल्याचा आरोप करीत, अवमान याचिका ही गोमंतकीयांची दिशाभूल करण्यासाठी आहे. म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवून दुसऱया बाजूने दुधसागर मार्गाने वाहणारा म्हादईचा प्रवाह अडविण्याचा कर्नाटकचा कुटील डाव आत्ताच हाणून न पाडल्यास सांगे, केपे व फोंडा तालुक्यावर भविष्यात मोठे पाणी टंचाई संकट येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर कोणता तोडगा काढणार हे जनतेला सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. म्हादईच्या प्रश्नावर श्वेत पत्रिका काढण्याची मागणीही ढवळीकर यांनी केली.
राज्यसभेचे खासदार शेतकऱयांना पुढील 5 वर्षे तरी साखर कारखाना सूरू राहणार असे सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्षांनी कारखाना कायमस्वरुपी चालणार हे आपल्याला दिलेले आश्वास खोटे म्हणायचे का ? असा प्रश्न ढवळीकर यांनी उपस्थित केला.









