प्रतिनिधी/ म्हसवड
आज सोमवारी म्हसवडमध्ये एका दिवसात 56 नागरिकांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे आजच्या आकडेवारीने मागचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत अर्धशतकाकडे म्हसवडची वाटचाल सुरु आहे. यामध्ये कोरोना सेंटरमध्ये बेड शिल्लक नसल्याने काहींनी होमआयसोलेशनचा पर्याय निवडला आहे. मात्र बाधितांच्या घरातील व्यक्ती इतरत्र बाहेर काही कारणास्तव फिरत असल्याने आगामी काळात कोरोनाची आकडेवारी वाढली तर याला जबाबदार कोण ? असे एक नाही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सदर बाधितांबाबत पालिकेला कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढून वाढणाऱया रुग्ण संख्येला कोण जबाबदार ? त्यामुळे म्हसवकर नागरीकांनी काळजी घ्यावी, अन्यथा यापेक्षा मोठा स्फोट आगामी काळात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
माण तालुक्यात विशेषत; म्हसवडसह इतर गावातही कोरोना संसर्गाचा प्रभाव कडक उन्हाच्या चटक्यात मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहे. कडक उन्हात कोरोनाचे विषाणू टिकणार नाही असे बोलले जाता होते, ते कोरोना संसर्गाने खोटे ठरवत गेल्या वर्षभर या महामारीचा संसर्ग आहे. या काळात आत्तापर्यत 124 टेस्ट पैकी 42 बाधित झाले होते. मात्र आज सोमवारी ही संख्या मागे टाकत 85 झालेल्या टेस्ट पैकी 56 टेस्ट कोरोना बाधित झाल्याने म्हसवड व परिसरातील नागरीकांत भिंतीचे वातावरण झाले आहे.
आज म्हसवड शहरातील शिक्षक कॉलनी, देवांग नगर, बाजार पटांगण नगसिंह गल्ली, डॉ आंबेडकरनगर कासार गल्ली में पेट नाथ मंदिर परिसरातील नागरिक बाधित झाले आहेत. आम्ही म्हसवडकर ग्रुपचे कोव्हीड ऑक्शीजनचे सेंटर 16 बेडचे होते, ते 25 बेडचे केले तरी ही हाऊस फुल झाले आहे. तर सीसी सेंटर मध्ये 120 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत, तरी ही रोज 50 च्यावर बाधितांची संख्या सापडत आहेत. मात्र बेड कोठेच उपलब्ध होत नसल्याने लोकांत भितीचे वातावरण आहे.








