नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रविंद्रनाथ टागोर यांचा वर्ण सावळा असल्याने त्यांची आई बालपणी त्यांना जवळ घेत नव्हती, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री सुभाष सरकार यांनी केलं आहे. या विधानानंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसनं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठात गेले होते. यावेळी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री सुभाष सरकार यांनी वादग्रस्त विधान केलं. टागोर यांच्या कुटुंबीयात सर्व गोऱ्या वर्णाचे होते. मात्र टागोर यांचा रंग सावळा होता. गोरा रंग दोन प्रकारचा असतो. एक हल्का पिवळ्या रंगास आणि दुसरा लालसर गोरा रंग असतो. टागोर यांचा रंग लालसर गोरा होता. इतर सदस्यांच्या तुलनेत ते सावळे दिसायचे. त्यामुळे त्यांची आई आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्यांना जवळ घेत नव्हते, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली.
सुभाष सरकार यांनी केलेलं वक्तव्य वर्णभेदी आहे. सरकार यांना इतिहास माहिती नाही. जगाला माहिती आहे रविंद्रनाथ टागोर यांचा रंग गोरा होता. अशा पद्धतीने वक्तव्य करून भाजपाॉने बंगालचा अपमान केला आहे. सुभाष सरकार यांना विश्व भारतीत पुन्हा बोलवू नये, अशी टीका तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









