तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील कलप्पावाडी येथे जन्मदात्या बापाने २८ वर्षीय मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रघुनाथ राजेंद्र जानकर असे या मृत मुलाचे नाव आहे. ही घटना काल, गुरुवार दि ३० रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत मुलगा रघुनाथ जानकर हा आपले वडील राजेंद्र रघुनाथ जानकर (वय ४९) यांच्याकडे दारूच्या नशेत मला ट्रॅक्टर घ्यायचे आहे, तुम्ही शेत विकून ५ लाख रुपये द्या असे म्हणून शिवीगाळ करु लागला. तेव्हा आरोपी राजेंद्र जानकर यांनी रघुनाथ यास मी शेत विकून पैसे देत नाही तुला काय करायचे आहे ते कर ! असे बोलल्यानंतर मुलाने वडिलांची कॉलर पकडली. त्यावेळी आरोपीने त्यास ढकलून देत कुऱ्हाडीने मयत रघुनाथ याच्या डोक्यात जोराने घाव घातले. असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. व परत त्याच्या पाठीत व डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. वडील आरोपी राजेंद्र रघुनाथ जानकर यांच्या विरोधात मंगलदास राजेंद्र जानकर यांनी दक्षिण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एच. काकडे हे करीत आहेत.
Previous Article१० एकर माडबागेत मिरी रोपे लागवड प्रात्यक्षिक शुभारंभ
Next Article एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ









