ऑनलाईन टीम / लखनऊ :
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या भेटीसाठी आलेले छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पोलिसांनी लखनऊ विमानतळावरच रोखले. त्यामुळे बघेल यांनी विमानतळावरच ठिय्या मांडला आहे.
लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना सोमवारी सीतापूर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 36 तास नजरकैदेत ठेवल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. कलम 144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सध्या सीतापूर विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारत प्रियंका गांधींना बंदीस्त करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश सरकार प्रियंका गांधींना अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बघेल त्यांची भेट घेण्यासाठी येत होते. मात्र, उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना लखनऊ विमानतळावरच रोखले. त्यामुळे बघेल यांनी विमानतळावरच ठिय्या मांडला आहे. याचा व्हिडिओही बघेल यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.