ऑनलाईन टीम / जळगाव :
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा आणून सरकार राष्ट्रीय एकात्मतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राजकीय विचारवंत योगेंद्र यादव यांनी केली आहे.
लोकशाही बचाव समितीतर्फे आयोजित ‘भारत संविधान लोकशाही’ विषयावरील सभेत यादव बोलत होते.
यादव म्हणाले, सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा आणून राष्ट्रीय एकात्मतेत फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा देशदोह आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकांमध्ये एक दरी निर्माण करणारा आहे. नागरिक जन्माचे दाखले सादर करू न शकल्यास त्यांच्यावर संशयाचा ठपका ठेवला जाईल. भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांना कोर्टात जावे लागेल. तर काहींना विदेशी कोर्टाचीही पायरी चढावी लागू शकते, असेही ते म्हणाले.