जून तिमाहीमधील आकडेवारीः डिजिटल प्लॅटफार्ममुळे गुंतवणूक तेजीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
म्युच्युअल फंड उद्योगाने जून तिमाहीमध्ये 18 लाख नवी गुंतवणूक खाती जोडली आहेत. यामध्ये बाजारात चढ उतार असतानाही फोलियोची एकूण संखा वधारुन 9.15 कोटीवर पोहोचली आहे. ग्रो के सह संस्थापक हर्ष जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार फोलियोच्या संख्येत वृद्धीत महत्वाची भूमिका ही डिजिटल प्लॅटफार्मनी निभावली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
फोलियोची संख्या लक्षात घेतल्यास यामध्ये अनेक नवी व्यक्तिगत गुंतवणूक खाती जोडण्यात आली आहेत. एका गुंतवणुकीसाठी अनेक फोलियो असल्याचे दिसून आले आहे. म्युच्युअल फंड्स इन इंडीयाच्या आकडेवारीनुसार जून तिमाहीत फोलियोची संख्या 17.96 लाखानी वधारुन 9,15,42,092 वर पोहोचली आहे. मार्च तिमाहीच्या अंतिमपर्यंत हा आकडा 8,97,46,051 इतका राहिला असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेअर बाजारात मार्चमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली यामध्ये गुंतवणूकदारांना याच दरम्यान गुंतवणुकीसाठी चांगली संधी निर्माण झाली होती. याच दरम्यान गुंतवणूकदार हे शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंडच्या आधारे गुंतवणूक करण्याकडे वळले असल्याचे आता दिसून येत आहे.









